महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र मुख्य बातम्या

औरंगाबादकरांना २ ऑक्टाेबरपासून रिक्षा प्रवासासाठी मोजावे लागणार जादा पैसे

नेशन न्यूज मराठी टीम.

औरंगाबाद/ प्रतिनिधी -औरंगाबाद शहरातील रिक्षा चालक संघटनेच्या दरवाढीच्या मागणीस जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे येत्या दाेन ऑक्टोबरपासून औरंगाबाद शहरात रिक्षातून प्रवास करण्यासाठी नागरिकांना जादा पैसे माेजावे लागणार आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून रिक्षाचालक संघटनेकडून भाडेवाढ करण्याची मागणी सुरू हाेती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ही मागणी मान्य करत रिक्षाचे भाडे दीड किलोमीटरला २६ रुपये तर पुढे प्रत्येक किलोमीटरसाठी १८ रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली. ही दरवाढ २ ऑक्टाेबरपासून लागू हाेईल
जिल्हाधिकारी म्हणाले मार्च २०२० मध्ये खटुआ समितीच्या शिफारशीनुसार शासनाकडे प्रस्ताव दिला होता. यानुसार रिक्षाला पहिल्या टप्प्यात दीड किलोमीटरला २६ रुपये तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला १८ रुपये अशी सुधारणा करण्यात आली. आता रिक्षाचालकांना कॅलिब्रेटर मीटर बसवावे लागतील. तोपर्यंत त्यांना ट्रॅफिक कार्ड दिले जातील. यासोबतच रिक्षाचालकांना गणवेश घालणे अनिवार्य असेल. पार्किंग नसलेल्या ठिकाणी रिक्षा पार्क करता येणार नाही. प्रवासी भाडे नाकारता येणार नाही. तसेच २ ऑक्टोबरपासून ६० दिवसांच्या आत नवे मीटर बसवावे लागतील. त्यासाठी ९ ठिकाणी सेंटर उघडले जाईल

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »