महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

प्रशासकीय राजवटीत किती अनधिकृत बांधकामे झाली त्याच ऑडिट करा-आमदार राजू पाटिल

नेशन न्युज मराठी टीम.

डोंबिवली – कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा हा गेल्या दशकभरापासून गाजतोय. या मुद्द्यावर उच्च न्यायालयानेही वारंवार केडीएमसीचे कान उपटले आहेत. मात्र त्यानंतरही कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांना रोखण्यात केडीएमसी प्रशासनाला अद्याप यश आलेले नाहीये. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबत निर्णय घेत. कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानूसार या सर्व अनधिकृत बांधकामांवर पुढील 3 महिन्यात कारवाई केली जाईल. असा निर्णय घेतला आहे

केडीएमसी प्रशासनाने येणाऱ्या तीन महिन्यात 20 हजार अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करणार असल्याचा निर्णय घेतला .या निर्णयानंतर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी या निर्णयावर टीका केली हा निर्णय लक्ष विचलित करण्यासाठी असल्याचे त्यानी सांगितले.आता मनसे आमदार राजू पाटील यानी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यावर टीका केली.अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली पाहिजे मात्र गेल्या वर्षभर प्रशासकीय राजवट आहे या काळात किती अनधिकृत बांधकाम झाली याच ऑडिट झालं पाहिजे असा सवाल केडीएमसी प्रशासनाला केला आहे.

केडीएमसी मध्ये वर्षाभरापासून प्रशासकीय राजवट आहे. त्या काळात किती अनधिकृत बांधकामे झाली.कोणत्या अधिकारी बिल्डरवर कारवाई झाली. तीन महिन्यात 20 हजार बांधकाम पाडता येतील का ? फक्त निवडणुकीचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला ? अशी टीका  मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी प्रशासनावर केली आहे . त्याच बरोबर आदी अनधिकृत बांधकाम प्रकरणी केडीएमसी अधिकारी आणि बिल्डरांवर कारवाही करा आशी मागणीहि त्यांनी केली.

जी बांधकामे झाली त्या संबंधित अधिकारी व बिल्डर वर कारवाई का केली नाही ,आता येत्या 3 महिन्यात 20 हजार बांधकाम तोडण्याची घोषणा केली हे शक्य आहे का ? निवडणूक जवळ आली आहे म्हणून काही टार्गेट देण्यात आले आहे. या टार्गेट साठी हे सर्व केलं जातंय का असा सवाल ही आमदार पाटील यांनी व्यक्त केला .

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »