महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

घाटात पत्नीला मारण्याचा प्रयत्न; होमगार्ड सतर्कतेमुळे पतीचा कट फसला

नेशन न्यूज मराठी टीम.

बुलढाणा/प्रतिनिधी – अकोल्यावरून बुलढाण्यात आणून राजूरच्या घाटात आपल्या पत्नीला जीवे मारण्याचा पतीचा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसलाय. राजूरच्या घाटातील देवीच्या मंदिराजवळ पत्नीला मारत असताना पत्नीकडून आरडाओरडा केल्याने पोलीस चौकीवर उपस्थित असलेल्या दोन होमगार्ड आणि एक्सरसाइज करणाऱ्या दोन युवतींच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले आहेत.

दरम्यान ह्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेख इब्राहिम शेख चांद असे आहे. आरोपी शेख इब्राहिम शेख चांद याने संशयातून पत्नीस फारकत देण्याचे ठरविले व काल २३ ऑक्टोबरला दुपारी कागदपत्र आणायचे सांगून पत्नीला बुलढाण्याच्या राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ आणले. त्यांनतर त्याठिकाणी ओढणीने गळा आवळला, यानंतर पत्नी ओरडल्याने परीसरात आवाज झाला. यावेळी पोलीस चौकीत असलेले होमगार्ड सोमनाथ वानरे, शुभम शेळके यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी तेथून एक्सरसाइज करणाऱ्या दोन युवतींनी त्याच दिशेने धाव घेतली. यावेळी शेख इब्राहिम शेख चांद हा त्याच्या पत्नीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, प्रसंगावधान राखत दोन्ही होमगार्ड आणि युवतींनी त्या महिलेचे प्राण वाचविले. व आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »