महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image आरोग्य ताज्या घडामोडी

कल्याणकरांच्या सेवेत एएसजी डोळ्यांचे रुग्णालय दाखल,रुग्णांना मिळणार १ महिना मोफत सेवा

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – देशातील ख्यातनाम नेत्रउपचाराची साखळी एएसजी आपल्या विस्तार धोरणाअंतर्गत कल्याण शहरात दाखल झाले आहे.कल्याण रॉक माउंट रेसिडान्सी, खडकपाडा येथे या रुग्णालयाची शाखेळ सुरुवात झाली आहे.एएसजी कल्याण शाखेचे उदघाटन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते पार पडले.एएसजी हॉस्पिटलडोळ्यासंदर्भातील अत्याधुनिक यंत्रनेचा वापर करून सुविधा देणार सुसज्ज हॉस्पिटल आहें. कल्याण शहरात अशा हॉस्पिटलची आवश्यकता होती. सर्व तज्ञ डॉक्टरांची टिम असल्याने रुग्णांना उत्तम उपचार याठिकाणी केले जातील. असे उदघाटन प्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर यांनी म्हंटले आहें.

सदर रुग्णालय मोतीबिंदू, लेसीक, विट्रो रेटिना सर्जरी, आक्युलोप्लास्टी, ग्लुकोमा, कोर्निया, तिरळेपणा, ऑप्थल्मोलॉजी नेत्ररोगाच्या श्रेणीवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. या रुग्णालयात डोळ्यांशी निगडित सर्व जटील शास्त्रक्रिया, निदान आणि उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. एएसजी डोळ्यांचे रुग्णालय वेळोवेळी मोफत जनजागृती आरोग्य शिबीर आयोजित करणार आहेत. सध्या सर्वच वयोगटातील लोकांचे स्क्रीनटाईमस अधिक असल्याने डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत. याकरिता सातत्याने शाळा, महाविद्यालय तसेच संस्था, संघटना याठिकाणी डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. वर्षातून प्रत्येकाने किमान 2 वेळा तरी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहें.

सन 2005 मध्ये डॉक्टर अरुण सिंघवी आणि डॉक्टर शिल्पी गांग या एम्स मधील दोन अनुभवी व्यक्तींनी एएसजी आय समूहाची महुर्तमेढ रोवली. त्यानंतर काही अनुभवी डॉक्टरांचा एएसजी समूहात समावेश झाल्यामुळे त्यांचा विस्तार होतं गेला. प्रत्येकाला जगातील सर्वोत्तम सुविधा देण्याबाबत कोणताही भेदभाव न करता समान उपचार पद्धती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने एएसजी समूहाची स्थापना करण्यात आली.

एएसजी समूहाचे रुग्णालय संपूर्ण भारतात कार्यरत आहें. आंतरराष्ट्रीय स्तरावर एएसजी रुग्णालयांची शाखा पूर्व आफ्रिका खंडातील युगांडा मधील कंपाला येथे कार्यरत असून दुसरी शाखा नेपाळ मधील काठमांडू येथे आहें.
मिळालेले मानाचे पुरस्कार एएसजी आय समूहाला आजवर अचिव्हरर्स 2009, उत्कृष्ट सेवेसाठी वेलनेस 2010, राजीव गांधी गोडमेडल 2014 आदी पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे. एएसजी नेत्र रुग्णालयात चार अनुभवी आणि वरिष्ठ डॉक्टरांची टिम काम कार्यरत असणार आहें. ज्यामध्ये डॉक्टर नितेश साळूंखे, डॉक्टर रोहित मेंडके, डॉक्टर मानस देशमुख आणि डॉक्टर हरीष पाठक यांचा समावेश आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »