महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे मुख्य बातम्या

भिवंडीतील गोदाम इमारत दुर्घटना प्रकरणी आर्किटेक्ट गजाआड

भिवंडी प्रतिनिधी – भिवंडी तालुक्यातील मानकोली नाका येथील हरिहर कंपाउंड येथे गोदामाची इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले होते. याप्रकरणी नारपोली पोलोसांनी गोदाम मालका विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र गोदाम मालक हे स्थानिक शेतकरी व भूमिपुत्र असल्याने हे गोदाम बांधकाम करणारे बांधकाम व्यावसायिक , कंत्राटदार व वास्तुविशारद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानी नागरिकांनी पोलीस व शासकीय यंत्रणेकडे केली होती. अखेर नारपोली पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणात सदर गोदाम इमारतीचे वास्तुविशारद दुर्राज शमीम कामणकर उर्फ केके इंजिनियर ( वय ४९ वर्षे ) यास शनिवारी अटक केली आहे. सदर वास्तुविशारद हा कोसळलेल्या गोडावून इमारतीचे बांधकामाचा आर्किटेक्ट, सव्र्हेअर व कन्सलटींग इजिनियर असल्याचे व त्याचा गुन्हयात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली असून शनिवारी त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.या कारवाईमुळे अनधिकृत व निकृष्ठ बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. 

Related Posts
Translate »