कल्याण/प्रतिनिधी – कल्याण लोकसभा (Kalyan loksabha election) मतदारसंघात एकूण ६ विधासभा मतदारसंघ आहे. कल्याणात सरासरी ४१.७० टक्के मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर कल्याण मतदार संघात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया ४ जून रोजी पार पडणार आहे. त्याकरिता सर्व प्रशिक्षित कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण झाले आहे. मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार असून त्यासाठी ६०० सरकारी कर्मचारी, ४५० पोलिस कर्मचारी त्याशिवाय उमेदवारांचे प्रतिनिधी असतील. मतमोजणी (Counting of votes) करीता सहा विधानसभा मतदासंघानुसार १४ टेबलची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर पोस्टल मतांची मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते (Sushma satpute) यांनी दिली.
- June 1, 2024