महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र मुख्य बातम्या

प्रसारमाध्यम प्रतिनिधींना विधान परिषद निवडणूक प्राधिकार पत्रासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिनिधी.

मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग, पुणे विभाग आणि नागपूर विभाग पदवीधर या तीन मतदारसंघांसाठी तसेच अमरावती विभाग आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. या निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीचे वृत्तसंकलन व छायाचित्रण करण्यासाठी मतदान केंद्र तसेच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्राधिकारपत्रे देण्यात येणार असून त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने केले आहे.

या निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून दि. 3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे.

प्राधिकारपत्रांसाठी इच्छुक वृत्तपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे दि. 17 नोव्हेंबर, 2020 पर्यंत तपशील व संपादकांच्या शिफारशींसह अर्ज पाठवावा. अर्जासोबत पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे जोडावीत. एकाच व्यक्तीला मतदान तसेच मतमोजणी अशा दोन्ही केंद्रामध्ये प्रवेश हवा असल्यास, अशा व्यक्तींची तीन छायाचित्रे देणे आवश्यक राहील.  छायाचित्रांच्या छायांकित (झेरॉक्स) प्रती स्वीकारल्या जाणार नाहीत. विहित दिनांक व वेळेपूर्वीच आपले अर्ज द्यावेत. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. अर्ज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे सादर करावेत.

Related Posts
Translate »