नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड / प्रतिनिधी – वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने सामाजिक न्याय विभागातील विविध मागण्यांसाठी समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे विद्यार्थी आक्रोश आंदोलन करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील सन 2021-22 व 22-23 या शैक्षणिक वर्षाची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी, भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती सन 2021-22 व 22-23 या शैक्षणिक वर्षाची रक्कम जमा करावी, शिष्यवृत्ती जमा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची टीसी तसेच इतर कागदपत्रे देण्यास नकार देणाऱ्या महाविद्यालयांवर कार्यवाही करण्यात यावी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची तालुकास्तरावर अंमलबजावणी करण्यात यावी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये व इतर शाखेतील विद्यार्थ्यांना २ हजार रुपये ठोक स्वरूपात शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी देण्यात यावे, स्वाधार योजनेतील विद्यार्थ्यांची समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून होणारी गृह तपासणी तात्काळ थांबवण्याची मागणी सहाय्यक आयुक्त यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धीरज हाके, जिल्हा महासचिव वैभव लष्करे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



