नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे उमर्टी गावाकडे रात्रीची पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार स्विफ्ट गाडीतून गावठी कट्टा घेऊन जाणाऱ्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ तिन गावठी कट्टा मिळून आले तिन गावठी कट्टा व स्विफ्ट गाडीसह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.सदर आरोपी पुणे जिल्ह्यातील आहे त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत
.अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर तीन गुन्हे दाखल आहे इतर जे साथीदार आहेत त्यांचे देखील क्रिमिनल पार्श्वभूमी आहे जेलमध्ये एकमेकांची ओळख होऊन मित्र झाले आहेत तिन गावठी कट्टे स्विफ्ट गाडी असे सहा लाख 80 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितनवरे किरण पाटील, भरत नाईक, राजू महाजन, प्रमोद पारधी, सुनील कोळी आदींनी कामगिरीमध्ये सहभाग नोंदवल्याचं पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी सांगितले.