नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – आपल्या कामासाबंधी विविध मागण्या शासन दरबारी दखल घेतली जावी यासाठी मुंबई महापालिका कर्मचारी संघटना समन्वय समितीचे आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले आहे. जवळजवळ १८ संघटना मिळून आंदोलनाचे आयोजन केले गेले .
सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण कलम 332 व 353 हे कलम रद्द करू नये तसेच कोरोना काळात कामगार , डॉक्टर, इंजिनिअर यांच्या वर होणारी कारवाई थांबावी. पाच लाखाची कॅशलेस सुविधा सामुदायिक गट विमा योजना लागू करावी. सातवे वेतन लागू करावे , आणि करार करावा. 05-05-2008 रोजी लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करावी. कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या मारहाणीवर व कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळावी अश्या प्रमुख मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.



