नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड / प्रतिनिधी – विमुक्त जाती व भटक्या जमातीची यांना मुलभूत हक्कासाठी अजूनही लढावे लागत आहे. रोजच्या जगण्यातील अविभाज्य भाग म्हणून शिक्षण, पिणायोग्य पाणी, प्राथमिक वैद्यकीय सुविधा, रस्ते या सुविधे अभावी जगताना आरक्षण हि विकासाच्या दृष्टीने एक पायरी असू शकते. परंतु अजूनही सरसकट सगळ्या भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण मिळालेले दिसून येत नाही. या आणि अश्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी प्रणित आदिवासी व भटक्या विमुक्त जमाती च्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
आंदोलकांनी यावेळी निदर्शने देखील केले आहेत. यामध्ये विमुक्त जाती भटक्या जमातीच्या लोकांची व महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी तेलंगणा, कर्नाटक तसेच विदर्भ मध्ये असलेल्या लोकांना जे आरक्षण आहे ते आम्हाला देखील मिळाले पाहिजे अशी विनंती देखील आंदोलकांनी प्रशासनाकडे केली आहे.



