मुंबई / प्रतिनिधी – आदिवासी विकास आश्रम शाळा आणि कर्मचारी यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनेक मागण्यांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी आहे की त्या आश्रमाच्या वेळेत बदल करावा. पहिले आश्रमाची वेळ ११ ते ५ होती परंतु शासनाने त्या वेळेचे बदल करून ९:३० ते ४ केली आहे. हा वेळ चुकीचा असल्याचा दिसून येत आहे कारण की सर्व शिक्षक विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांना या वेळेत कामा होत नाही असा दिसून येत आहे त्यामुळे याचा विरोध करण्याकरिता हे आंदोलन करण्यात येत आहे.
यासारख्या विविध मागण्यां संदर्भात मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र देखील देण्यात आले आहे परंतु याची दखल अजूनही कोणी घेतलेली नाही. शासन आपल्या दारी ही योजना सुरू आहे परंतु काही सामान्य नागरिकांच्या दारापर्यंत ही योजना येत नसल्याचे दिसून येत आहे. यांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.



