DESK MARATHI NEWS ONLINE.
डोंबिवली/प्रतिनिधी – काही वर्षापूर्वी डोंबिवली औद्योगिक परिसरात हिरवा पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आता चक्क दोन दिवस डोंबिवलीजवळील एमआयडीसीतील काही भागात पत्र्यांचे शेड, वाहने व कपड्यांवर काळसर ठिपके काळा पडल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेतील गुणवत्ता दर्शविणारे मशीन डोंबिवलीपासून लांब अंतरावर बसवले आहेत. तर विभागाचे कार्यालय कल्याण येथे आहे. डोंबिवलीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय कां नाही? एकही अधिकारी का दखल घेत नाही? याचा जाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवार 8 तारखेलाजाब विचारण्या करता गेले असता डोंबिवलीत कार्यालय का नाही असा प्रश्न उपस्थित केला.
दोन दिवस डोंबिवली एमआयडीसी परिसरामध्ये काळा पाऊस, काळा रंगाच्या ठिपके पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या सूचनेनुसार पदाधिकारी व मनसैनिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला
मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा अध्यक्ष सुदेशजी चुडणाईक, विधानसभा सचिव उदय वेळासकर, अरुण जांभळे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंदजी म्हात्रे, शहर संघटक तकदिर काळण, हरीष पाटील, शहर सचिव संदीप ( रमा ) म्हात्रे, उपशहर अध्यक्ष श्रीकांत वारंगे,प्रेम पाटील,विभाग अध्यक्ष संजय चव्हाण,रवी गरुड, रक्षीत गायकर, प्रदीप चौधरी, संजय पाटील, कदम भोईर,महिला विभाग अध्यक्षा संगिता खोत पदाधिकारी , उपविभाग अध्यक्ष , महिला व पुरुष शाखा अध्यक्ष व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डोंबिवलीत कार्यालय नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांना एमआयडीसी कार्यालयात बोलावून घेत त्यांना जाब विचारला.आपलं कार्यालय कल्याण मध्ये का? डोंबिवलीकरांना वाऱ्यावर सोडून पालक ठाण्याला आणि अधिकारी कल्याणला अशा प्रकारचे वातावरण या ठिकाणी का असा जाब मनसेने विचारला.आपण आपलं काम योग्यरीत्या व व्यवस्थितपणे पार पाडावी अशी सूचना वजा इशारा यावेळी मनसेने अधिकाऱ्यांना दिला.पुढील दोन दिवसात २४ तास उपलब्ध होतील असे अधिकारी डोंबिवलीमध्ये बसवु व हवेतील गुणवत्ता दर्शवणारा फलक एमआयडीसी परिसरात लावू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर मनसेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला.
गेल्या वर्षी डोंबिवलीतील एका कंपनीच्या स्फ़ोटाप्रकरणी मंत्री उद्या सामंत हे घटनास्थळी आले असता डोंबिवलीजवळील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर करण्याचाबाबतचा धोरणत्मक निर्णय झाल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र त्यानंतर या निर्णयाचे पुढे काय झाला असा प्रश्न यावेळी मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी उपस्थित केला.