महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

कार्यकर्त्यांनी मातोश्री किवा अजित दादा यांच्या बंगल्यावर मोर्चा काढावा -भाजप आ.गणपत गायकवाड

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/_d6yUYuLABQ

कल्याण – मागील महिन्या भरापासून कल्याण पूर्व तल श्रीमलंग गड परिसरात रात्री ९ ते १० तास भारनियमन केले जात असल्याने नागरिकाची झोप उडाली आहे. दररोज होणाऱ्या भारनियमनाने त्रस्त नागरिकांनी व स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयात मेणबत्तीच्या प्रकाशात चर्चा करत आंदोलन केले यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी टीका करत शिवसेने जो मोर्चा काढला तो लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले त्याच बरोबर त्यांनी मातोश्री वर किवा अजित दादा यांच्या बंगल्यावर मोर्चा काढा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

ज्यांची सत्ता आहे त्याचेच लोक सरकार विरोधात मोर्चा काढतात याचा अर्थ असा आहे कि त्यांना कळते की आपली सरकार काही काम करत नाही आपली सरकार अपयशी आहे असा खोचक टोलाही भाज आमदार यांनी लगावला आहे. प्रत्येक गोष्ट केंद्राकडे ढकलतात 2009 ते 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता केंद्रांबरोबर राज्यातही होती त्यावेळेला ही जीत जोड शेडीग होत होती
ज्याला लोक कंटाळलेले होते मात्र 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचे सत्ता आल्यानंतर लोडशेडिंग ही नाहीशी झाली याचा अर्थ जे राज्यकर्ते आहेत त्यांना राज्य करता येत नाही अशी टीका करत आमदार गायकवाड यांनी महाविकास आघाडीवर निशाना साधला.

काही झालं तर केंद्राकडे बोट दाखवायचे, आपण पाहिलं तर डिझेल दरवाढीवर काँग्रेसने मोर्चा काढत आंदोलन केले खरंतर केंद्राने जेव्हा डिझेल पेट्रोलचे दर कमी केले त्यावेळेला राज्यात डिझेल पेट्रोलचे दर दहा ते बारा रुपये कमी व्हायला हवे होते ते या राज्य शासनाने केले नाही म्हणून ठाकरे सरकार कुठेतरी अपयशी ठरत आहे त्याचबरोबर ठाकरे सरकारच्या विरोधातच ठाकरे सरकारची लोक आंदोलन करतात याचा मला खूप आनंद वाटतोय असे म्हणत अंधाराने शिवसेनेला घरचा आहेर दिला की काय असा टोला लावलाय भाजप आमदार यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×