महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

कल्याण पूर्वेत महिला वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नेशन न्युज मराठी टीम.

कल्याण – थकीत वीज बिलापोटी मीटर काढणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण करून मीटर हिसकावून नेल्याची संतापजनक घटना कल्याण पूर्वेतील मारवाडी चाळ येथे सोमवारी दुपारी घडली. यासंदर्भात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मोहनदास करुनाकरण नायर (वय ५३, राहणार सरस्वती सोसायटी, ए विंग, कृपा कॉम्प्लेक्स जवळ, कल्याण पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काटेमानवली शाखेत कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ सविता काटे या त्यांच्या सहकारी विद्युत सहायक पल्लवी टोळे यांच्यासह काटेमानवली नाका परिसरात वीजबिल वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याचे काम करत होत्या. थकबाकीपोटी त्यांनी किरण लालवाणी यांच्या गाळा क्रमांक एकचा (मारवाडी चाळ, अय्यप्पा मंदिराजवळ, चिंचपाडा रोड) वीजपुरवठा खंडित करून मीटर काढले.
 दरम्यान मोहनदास नायर या आरोपीने महिला कर्मचाऱ्यांना मीटर का काढले याचा जाब विचारत शिवागाळ केली. इतक्यावर न थांबता आरोपीने वरिष्ठ तंत्रज्ञ सविता काटे यांचे केस पकडून मारहाण केली व मीटर हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. यासंदर्भात काटे यांच्या फिर्यादीवरून कोळसेवाडी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ व ३३२ (सरकारी कामात अडथळा, कर्मचाऱ्याला मारहाण करणे), ५०४ व ५०६ (धमकावणे), १८३ (वैध कारणाने सरकारी मालमत्ता ताब्यात घेण्यास विरोध) नुसार मोहनदास नायर विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिस उपनिरिक्षक मल्लिनाथ डोके या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »