नेशन न्यूज मराठी टीम.
कोल्हापूर – करमुक्त स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादने ह्यावर लादलेल्या जीएसटीमूळे महागाईत अवाजवी वाढ झालेली आहे त्यामूळे दरवाढ रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रा.विलास कांबळे यांच्या नेतृत्वा खाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रविना कांबळे, शहराध्यक्ष मिलिंद पोवार, जिल्हा महासचिव महादेव कुंभार, सिध्दार्थ कांबळे, मल्हार शिर्के, शहराध्यक्ष पांडुरंग मानकापूरे, ॲड महेश कांबळे, वैशाली कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विजय कट्टी, तालुका अध्यक्ष आशापक देसाई, भीमराव गोंधळी, श्रीनिवास कामात, आदिं उपस्थित होते.
वाढत्या महागाईमूळे सामान्य जनता त्रस्त असतांना जनतेला पुन्हा महागाईच्या खाईत ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून 18 जुलै पासून आता अनेक दैनंदिन वस्तूसाठी नागरिकांना जास्तचे पैसे मोजावे लागणार आहेत , आजपर्यंत करमुक्त असलेल्या स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादनांवर देखील जीएसटी लादण्याचा निर्णय घेण्यात आल्याने महागाईत प्रचंड वाढ होणार आहे, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सितामन यांनी काही नविन उत्पादने , वस्तू आणि सेवांवरील जीएसटीचे दरवाढ जाहिर केले आहे, त्यात पाच टक्के कर दर स्लॅब अंतर्गत राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या पॅनेल आणि फिटमेंट कमिटीच्या शिफारशी स्विकारण्यात आल्या आहेत त्यानुसार प्रचंड दरवाढ होणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
दैनंदिन वापराच्या वस्तू जीएसटीच्या कक्षात समाविष्ट केल्याने केंद्र सरकारने सामान्य माणसाच्या आयुष्यात आणखी अडचणी वाढविल्या, त्यामूळे गोरगरिबांना हालअपेष्टा सहन कराव्या लागणार असल्याने ही दरवाढ मागे घ्यावी अशी जोरदार मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.



