महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश महत्वाच्या बातम्या

ऑनलाईन सेवांसाठी आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक

नेशन न्यूज मराठी टीम.


नवी दिल्ली / प्रतिनिधी – ऑनलाईन सेवांच्या सुलभ उपलब्धतेसाठी आता आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक असणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधार कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जाहीर केली आहे. नोंदणीकृत मोबाइल नंबर अचूक आणि अद्ययावत राखण्याच्या महत्त्वावर या सूचनेत भर देण्यात आला आहे. आजच्या डिजिटल युगात शासकीय आणि बिगर- शासकीय सेवा, अनुदान, निवृत्तीवेतन, शिष्यवृत्ती यासारख्या इतर अनेक सुविधा मिळवण्यासाठी आधार नंबर हा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे आधारकार्डाशी संबंधित माहितीची अचूकता सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आधार द्वारे मिळणाऱ्या ऑनलाइन सेवांचे जग खुले करण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल नंबर गुरूकिल्ली म्हणून काम करतो. शासकीय आणि बिगर- शासकीय सेवा, अनुदानाचा लाभ, निवृत्तीवेतन, शिष्यवृत्ती, सामाजिक लाभ, बँकिंग, विमा, कर आकारणी, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य सेवा यासह इतर सेवांच्या विस्तृत श्रेणीची उपलब्धता सक्षम करण्यासाठी हे आवश्यक आहे. या सेवांचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वैध आणि अद्ययावत मोबाइल नंबर आवश्यक आहे.

आधारसाठी नोंदणी करताना वापरकर्त्याचा मोबाईल नंबर आधीच नोंदणीकृत केलेला नसेल, तर त्याची नोंदणी करण्यासाठी कायमस्वरूपी नावनोंदणी केंद्राला भेट देणे गरजेचे आहे. एकदा नोंदणीकृत झाल्यानंतर, मोबाइल नंबर अनेक महत्त्वाच्या सेवांमधील दुवा म्हणून काम करत करतो. विवाह, स्थलांतर किंवा वैयक्तिक तपशिलांमध्ये बदल यासारखे बदल आधार माहितीमध्ये अद्यतनीत करणे आवश्यक आहे. या बदलांमध्ये नाव, पत्ता, मोबाइल नंबर, ईमेल पत्ता आणि इतर काही बदल समाविष्ट असू शकतात. सेवा वितरणातील व्यत्यय टाळण्यासाठी आणि आधार प्रोफाइलची अखंडता राखण्यासाठी अचूक लोकसंख्याशास्त्रीय माहितीची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

आधार कार्डावरील लोकसंख्याशास्त्रीय माहिती अद्यतनीत करणे आवश्यक असून अधिकृत UIDAI पोर्टलद्वारे ही प्रक्रिया सहजपणे करता येते. नावनोंदणी प्रक्रियेतील चुका दुरुस्त करणे किंवा इतर आवश्यक बदल करणे असो, UIDAI पोर्टल ही अद्यतने सुलभ करण्यासाठी वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस प्रदान करते. विस्तृत श्रेणीमधील सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक असेल तेंव्हा त्यांच्या लोकसंख्याशास्त्रीय माहितीची पडताळणी आणि माहिती अद्ययावत करावी असे आव्हान युआयडीएआयच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »