DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून एका तरुणाने उडी मारून गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना काल संध्याकाळी घडली होती. या घटने मुळे रुग्णालयात गोंधळाचे वातावरण पसरलं असल्याचे पाहायला मिळाले.यावर रुग्णालय प्रशासनाने काहीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मानपाडा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गुरुवारी संध्याकाळी एक तरुण रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत सुमारे अर्धा तास उभा होता. त्यानंतर त्याने चौथ्या मजल्यावरील गॅलरीतून उडी मारली. हे टोकाचे पाऊल त्याने का उचलले याचा तपास पोलिस करत आहेत;
पडल्यानंतर तो तरुण गंभीर जखमी झाला होता, त्याच्यावर तातडीने तेथे उपचार सुरू करण्यात आले होते. पण आज सकाळी सहा वाजता त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार त्या तरुणाची आई कर्करोगाची रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे, तिच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरील लोकांच्या म्हणण्यानुसार, छताच्या गॅलरीतून चढून तो तरुण खाली उडी मारणार होता, त्याच वेळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. परंतु त्यांना त्याला खाली उडी मारण्यापासून वाचवता आले नाही.उडी मारल्यानंतर गंभीर जखमी होऊन सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. यामागील नक्की कारण काय होते? पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Related Posts