DESK MARATHI NEWS NETWORK
ठाणे/प्रतिनिधी – ‘आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशन’*च्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक आहाराचे महत्त्व आणि सायकलिंगसाठी उपयुक्त खाद्यपदार्थांचा प्रसार व्हावा यासाठी “सायकल आणि पौष्टिक आहार : पाककला स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. वाढत्या जंक फूडच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, भारतीय पारंपरिक आहार संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
स्पर्धा ३ ऑगस्ट २०२५ रोजी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे (प.) येथे पार पडणार असून, पारितोषिक वितरण समारंभ दुपारी २ वाजता त्याच ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.ही स्पर्धा पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी ते पंधरावी आणि खुला गट (२१ वर्षांवरील सायकलिस्ट) अशा चार गटांमध्ये होणार आहे. सहभागासाठी नोंदणीची अंतिम तारीख २७ जुलै २०२५ आहे. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. डॉ. प्रतिक्षा बोर्डे या स्पर्धेच्या समन्वयक आहेत.
स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तीपत्रक, विजेत्यांना आकर्षक पारितोषिके, आणि सायकल खरेदीसाठी विशेष सवलत दिली जाणार आहे. परीक्षक म्हणून नामवंततज्ज्ञ उपस्थित राहणार असून ते पदार्थांवर आधारित स्पर्धकांना प्रश्न विचारणार आहेत. स्पर्धेच्या अटींनुसार, सहभागी स्पर्धकांनी शाकाहारी पदार्थ बनवून आणावे, प्रत्येक पदार्थांमध्ये प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि खनिजे या चार पौष्टिक घटकांचा समावेश असावा. गोड पदार्थांमध्ये गुळ किंवा खजुराचा वापर प्रोत्साहित केला जाईल. प्रत्येक स्पर्धकाने पदार्थासोबत पाककृतीची माहिती आपल्या नाव नंबरसह पुठ्ठ्यावर लिहून आणणे आवश्यक आहे.सायकलप्रेमींसाठी ही स्पर्धा आरोग्य आणि क्रिएटिव्हिटीचा सुंदर संगम ठरणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावी
https://forms.gle/bTtUZoFSh7tF5rnP9
अधिक माहितीसाठी डॉ. प्रतिक्षा बोर्डे (9867248232), चंद्रशेखर जगताप (9221310996), ज्ञानदेव जाधव (8652020877) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, aamhicyclepremi@gmail.com या ईमेल आयडीवर देखील संपर्क साधू शकतात.
स्पर्धेचे स्वरुप खालीलप्रमाणे
वयोगट :
१. ५ वी ते ७ वी
२. ८ वी ते १० वी
३. ११ वी ते १५ वी
४. खुला गट ( २१ वर्षांवरून पुढे आणि तो स्पर्धक हा सायकलिस्ट असणे बंधनकारक आहे)
स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख २७ जुलै २०२५
स्पर्धेचे वैशिष्ट्य
१. नामवंत परीक्षकांकडून परीक्षण
२. स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धकाला मिळणार प्रशस्तीपत्रक
३. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवर पाहुण्यांकडून आकर्षक पारितोषिके देऊन होणार सत्कार
४. प्रत्येक स्पर्धकाला सायकलवर मिळणार विशेष सवलत
स्पर्धेची तारीख : 03 ऑगस्ट 2025
स्पर्धेची वेळ : गटांप्रमाणे
पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी : सकाळी 11 ते 1
अकरावी ते बारावी आणि खुला गट (21 वर्षांवरील सायकलिस्ट ) : सकाळी 8 ते 10
स्पर्धेचे ठिकाण : सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे (प.)
पारितोषिक वितरण समारंभ : ०३ ऑगस्ट, दुपारी २ वाजता (त्याच ठिकाणी)
स्पर्धेच्या अटी खालीलप्रमाणे
१. स्पर्धेसाठी बनवणाऱ्या पौष्टिक पदार्थांमध्ये प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहाइड्रेट, खनिजे या (चार ) घटकांचा समावेश असणे बंधनकारक आहे.
२. पाककलेसाठी येणारा पदार्थ हा केवळ शाकाहारीच असावा.
३. पदार्थ बनवताना आहार तज्ञ किंवा आयुर्वेदतज्ञांचा सल्ला घेण्यास हरकत नाही.
४. गोड पदार्थ बनवणार असल्यास त्यात साखरेचा वापर टाळावा. गुळ किंवा खजुर असल्यास उत्तम
५. पाचवी ते दहावी इयत्तेत शिकणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या पालकांच्या मदतीने तर अकरावी — बारावी आणि खुल्या गटातील स्पर्धकांनी स्वतःने हे पौष्टिक पदार्थ बनवायचे आहेत.
६. स्पर्धकाला त्या पदार्थाविषयी नामवंत परीक्षकांकडून प्रश्न विचारले जातील.
७. एकावेळी एकाच पदार्थाला प्रवेश असेल
८. खुल्या गटातील स्पर्धक हा २१ वर्षांवरील असावा, तो सायकललिस्ट असणे बंधनकारक असून त्याची Strava किंवा इतर स्पोर्ट्स ॲपवर आधीच्या राईड तपासल्या जातील.
९. पदार्थाची डिश सजवून आणावी तसेच त्याची पाककृती पुठ्ठ्यावर लिहून आणावी. त्यावर पदार्थाचे नाव, त्याचे साहित्य, स्वतःच्या शाळेचे/ महाविद्यालयाचे नाव, मोबाईल क्रमांक (व्हाट्सअप असलेला) असावा
१०. विजेत्यांची नावे पारितोषिक वितरणाच्या दिवशी घोषित करण्यात येतील.
११. परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि सर्वांना बंधनकारक राहील.
१२. स्पर्धेच्या अर्धा तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे.