नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – घाटकोपर च्या नारायण नगर विभागात फायबर चे काम करणाऱ्या जाम डिजाईन सेंटर या दुमजली कंपनी ला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील वस्तू आणि केमिकल च्या कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या मध्यावर जाम डिजाईन सेंटर ही कंपनी आहे. या कंपनी मध्ये मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात. सुदैवाने आग लागली तेव्हा कामगार कामावरून निघून गेले होते. मात्र आठ ते दहा कामगार कंपनी मध्ये होते. आग लागली तेव्हा ते बाहेर पळाले. यामुळे जीवितहानी टळली. मात्र कंपनी आगीत जाळून खाक झाली आहे.



