नेशन न्यूज मराठी टिम.
नाशिक/प्रतिनिधी – नाशिकच्या पेठ रोडवरील नाशिक महापालिकेच्या कमानी जवळ मिक्सर ट्रक आणि राज्य महामंडळाच्या लाल परी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मिक्सर ट्रकचा चालक ठार झाला असून बस चालक आणि वाहक गंभीर जखमी झाला आहे. बाळू बेंडकुळे असं मृत्यू झालेल्या ट्रक ड्रायव्हर चे नाव आहे. दोन्ही वाहनाच्या धडकेत 15 ते 16 प्रवासी किरकोळ व मध्यम स्वरूपाची जखमी झाले आहेत.
नाशिकच्या पेठ वरून निघालेली ही बस पुण्याला निघाली होती मात्र नाशिकच्या पेठ रस्त्यावरील नाशिक महानगर पालिकेच्या कमानी जवळ महामंडळाची बस आणि मिक्सर ट्रकचा समोरासमोर अपघात झाला आहे. रस्त्याने येत असताना किरकोळ स्वरूपाचा पाऊस येत होता त्यामुळे रस्ते ओले झाले होते. त्यामुळे बस चालकाचे गाडी ह्या या रस्त्यावरून स्लिप झाल्याने समोर येणाऱ्या मिक्सर ट्रकला जाऊन आदळली असल्याची माहिती प्रवाशांनी दिली.
पेठ व जुना आडगाव नाका येथील 108 चे ॲम्बुलन्स ने जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच बसमधील प्रवासी दुसऱ्या बसने नाशिककडे पोहोचले. तर काही जखमींना बसमधूनही शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.



