महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी महाराष्ट्र

ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक वेशात गुढीपाडव्यानिमित्त कल्याणकरांची खास शोभायात्रा 

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – आज चैत्र प्रतिपदा मराठी नूतन वरच्या  सुरुवात. आज घरोघरी विजयाचं प्रतिक गुढी उभारण्यात आली आहे. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. श्रीरामाचा विजय दिन प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवला आणि ते अयोध्येत परतले तेव्हा, त्या दिवसापासून गुढीपाडवा  साजरा केला जातो, अशी मान्यता आहे.

मुंबई आणि पुणेत पाडव्यानिमित्त भव्य शोभा यात्रा निघाल्या आहेत. गुढीपाडव्याला मराठी नववर्षांचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात येतंय. डोंबिवली, कल्याण, ठाणे आणि गिरगावात शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येतंय. पारंपरिक वेशभूषेत तरुणाईसह लहानथोर उत्साहाने या शोभायात्रांमध्ये सहभागी होत आहेत. या शोभायात्रांच्या माध्यमातून केवळ तरुणाई नटून थटून बाहेर पडते असं नाही तर यातून विविध सामाजिक संदेशही दिले जात आहेत.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कल्याणातील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेला अत्यंत उत्साहात सुरुवात झाली. ढोल ताशाचा गजर, लेझीम पथक, शेकडो नागरीक, सर्व समाज बांधव स्वागत यात्रेत सहभागी झाले. यावेळी इंडीयन मेडीकल असोसिएशन कडे यंदाच्या रौप्य महोत्सवी नववर्ष स्वागतयात्रेचे यजमानपद आले होते. त्यांनी कल्याणातील मराठी बांधवांसह गुजराथी, जैन, पंजाबी, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय समाजालाही या स्वागतयात्रेमध्ये सहभागी करून घेतल्याने त्याला सर्वसमावेशक असे स्वरूप प्राप्त झाले होते. तर यावेळी मुख्य स्वागतयात्रेसोबत आणखी दोन भव्य शोभायात्राही कल्याण पश्चिमेत निघाल्याने कल्याणच्या कानाकोपऱ्यात हिंदुत्वाचा जयघोष आणि कल्याणकरांचा जल्लोष दिसून आला. जागोजागी काढण्यात आलेल्या भव्य रांगोळ्या आणि विविध सामाजिक संस्थांकडून या स्वागत यात्रेचे पुष्पवृष्टीत स्वागत केले जात होते. चौका-चौकात काढण्यात आलेल्या सुदंर आणि आकर्षक अशा रांगोळ्या या स्वागत यात्रेचे विशेष आकर्षण ठरत आहेत. येथील मुरबाड रोड येथून स्वागतयात्रा सुरू झाली असून रामबाग, सहजानंद चौक, छ्त्रपती शिवाजी महाराज चौक, टिळक चौक, लालचौकी मार्गे ही स्वागतयात्रा फडके मैदानात जाणार आहे. तर यंदा प्रथमच मुख्य स्वागत यात्रेसोबत खडकपाडा आणि आधारवाडी येथूनही दोन उप स्वागत यात्रा निघणार आहेत.

कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड परिसरातून कल्याणच्या या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. ज्यामध्ये ढोल ताशा पथक, महिलांचे लेझीम पथक यासोबतच टाळ मृदुंगाच्या निनादात जय श्रीरामचा गजर पाहायला मिळाला. तर या शोभायात्रेत कल्याण डोंबिवली महपालिकेतर्फे मतदान जनजागृतीपर , विद्युत विभागातर्फे सौर ऊर्जा जनजागृतीपर चित्ररथासह पर्यावरण संरक्षण, अवयवदान, आरोग्य आदी जनजागृतीपर चित्ररथ सहभागी झाले होते. रामबाग, सहजानंद चौक, छ्त्रपती शिवाजी महाराज चौक, देवी अहिल्याबाई होळकर चौक, टिळक चौक, पारनाका, लालचौकी मार्गे फडके मैदानात पोहोचली.

कल्याण पश्चिमेत यंदा मुरबाड रोड येथील मुख्य स्वागत यात्रेसोबतच खडकपाडा साईचौक आणि उंबर्डे, आधारवाडी येथूनही दोन भव्य शोभायात्रा निघाल्या होत्या. उंबर्डे येथून कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने आगरी कोळी समाजबांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. खडकपाडा साई चौकातून निघालेली ही शोभायात्रा आणि उंबर्डे येथून निघालेली शोभायात्रा या दोन्ही स्वागतयात्रा वासुदेव बळवंत फडके मैदानात मुख्य स्वागतयात्रेत जोडल्या गेल्या. त्यावेळी फडके मैदानात अक्षरशः भगवी लाट निर्माण झाल्याचे दिसून आले. याठिकाणी उभारण्यात आलेल्या 25 फुटी महागुढीला 125 ढोल आणि 40 ताशांच्या माध्यमातून अप्रतिम असे अभिवादन करून ही भव्य स्वागतयात्रा विसर्जित करण्यात आली.

यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, स्वागतयात्रा समिती समन्वयक डॉ.प्रशांत पाटील, भिवंडी लोकसभेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे, कल्याण संस्कृती मंचचे ॲड.निशिकांत बुधकर, केडीएमसीचे संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, ॲड. जयदीप हजारे यांच्यासह कल्याणातील हजारो मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »