महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
थोडक्यात महाराष्ट्र

माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा सुधारणा विधेयकावर पुनर्विचार करण्यासाठी विशेष समिती गठीत

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – गेल्या तीन दिवसापासून मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या माथाडी कायदा बचाव कृती समितीचे आमरण व साखळी उपोषण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आज चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाची अधिवेशन चालू असताना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा घडवून आणली. या शिष्टमंडळात विविध माथाडी कामगार संघटनेचे नेते उपस्थित होते या चर्चेतून माथाडी कामगार सुधारणा विधेयकांवर पुनर्विचार करण्यासाठी एक सर्वसाधारण समिती व ११ सदस्यांची कृती समिती गठित करण्यात आली. यामध्ये शासनाच्या कामगार, नगर विकास, पणन, गृह खात्याचे सचिव विविध माथाडी कामगार नेत्यांचा समावेश असून या समितीने तीन महिन्यांच्या आत माथाडी कायदा सुधारणा विधेयकावर चर्चा चौकशी करून तीन महिन्यांच्या कालावधीत शासनाला प्रस्ताव सादर करावा. तोपर्यंत माथाडी कायदा सुधारणा विधेयकातील सुधारणा प्रलंबित ठेवण्यात येतील असाही निर्णय घेण्यात आला व त्या निर्णयाचे लेखी पत्र मंत्री महोदय दादा भुसे यांनी आझाद मैदानातील माथाडी कामगारांच्या उपोषणा स्थळी ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांच्या हाती सुपुर्द केले व दादा भुसे यांच्या हस्ते बाबा आढाव यांना ज्युस पाजून उपोषण थांबविले.

कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी वेगाने हालचाल करून शासन आणि माथाडी कायदा बचाव कृती समितीमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी अथक मेहनत घेतली, तर आमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी कायद्यातील सुधारणा विधेयकावर विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशा झालेली चचा व निर्णयाची माहिती आंदोलनकांना दिली. उपोषणाच्या शेवटी बोलताना बाबा आढाव म्हणाले की, या तीन महिन्यांच्या अवधीत माथाडी मंडळांचा घसरलेला कारभार सुधारला पाहिजे, माथाडीच्या कार्यक्षेत्रात गुंडगिरी करणाऱ्या खंडणीखोरांचा बंदोबस्त झाला पाहिजे, आमच्यातले जर कोणी गुंडगिरी करत असतील तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू. स्वच्छ कारभाराने लोकांना न्याय दिसला पाहिजे असे ते म्हणाले व नरेंद्र पाटील आणि माथाडी नेते व कामगार यांनी गेले चार दिवसापासून उपोषणाला पोलीस यंत्रणा, मिडीया, वृत्त प्रतिनिधी, माथाडी कामगार यांनी दिलेला प्रतिसाद आणि उपोषण स्थळी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सर्व नेत्यांचे आभार मानले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »