WWW.nationnewsmarathi.com
नवी मुंबई/प्रतिनिधी – गोवा येथे घडलेल्या हत्या व दरोड्याचा गुन्हा नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने नंबर प्लेट नसलेली एक संशयित कार अडवून त्यातील तरुण व तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी सदर कार चोरीची आहे व त्यांनी एकाची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे. जितेंद्र साहू आणि राहुजा असे आरोपींची आहेत.
गोवा येथील पोर्व्हरीम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका व्हिलामध्ये निम्स बादल या जेष्ठ नागरिकाची हत्या करुन पळ काढला होता. निम्स यांच्या सोबत सोशल मीडिया वरून यांची ओळख झाली होती. यावेळी त्यांना गोवा फिरण्यासाठी आमंत्रण दिले होते. रात्रीच्या दरम्यान निम्स यांची हत्या करुन त्यांचे दागिने आणि गाडी घेऊन आरोपींनी पळ काढला होता. बिगर नंबर प्लेटच्या गाडीमुळे सदर गुन्हा उघडकीस आला असून निम्स यांनी राहुजा सोबत गैरवर्तन केल्याने त्यांची हत्या केल्याचे आरोपींनी सांगितले आहे.



