नेशन न्यूज मराठी टीम.
जालना / प्रतिनिधी – देशात होणारे सर्वाधिक मृत्यू आणि मृत्यूदर लक्षात घेता रस्त्यावर होणारे अपघात व त्याने ओढवणारे मृत्यू हे अग्रस्थानी आहेत. अशीच एक घटना जालना येथे घडली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव खासगी बस पूलाखाली कोसळून झालेल्या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोघे गंभीर जखमी आहेत. ही घटना बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात घडली. एक खासगी बस ही पुण्याहून नागपूरच्या दिशेने जात होती.
ही बस छत्रपती संभाजीनगर ते जालना मार्गावरील बदनापूर नजीक मात्रेवाडी शिवारात आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळली. अपघाताची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील जखमींवर जालना येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.



