DESK MARATHI NEWS.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – ठाणे खंडणी विरोधी पथकाने दमदार कामगिरी करत एका सराईत गुन्हेगाराला दोन पिस्टलसह बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी ही कल्याण मोहने रोड, बंदरपाडा, येथे या सराईत गुन्हेगारच्या मुसक्या आवळल्या आहेत. खंडणी विरोधी पथकात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सचिन शिंदे रा. बंदरपाडा, कल्याण याच्या कडे दोन गावठी बनावटीच्या पिस्टल व काडतुस आहेत. सचिन हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे तो या पिस्टलच्या सहाय्याने कुणा व्यक्तीला दुखापत घातपात किवा गंभीर गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्यामुळे खंडणी विरोधी पथकाने त्वरित एक्शन मोड मध्ये येत सापळा रचून मोठ्या शिताफीने सचिन शिंदे याला ताब्यात घेतले.
बंदर पाडा येथून सचिन शिंदे याला ताब्यात घेतले असता त्याच्या कडे बेकायदेशिर रित्या विनापरवाना दोन गावठी बनावटीचे पीस्टल, 1 जिवंत काडतुस असा 1,00,500/- रूपये किमतीचे अग्निशस्त्र आढळून आले. त्यानुसार आरोपीच्या विरूद्ध खडकपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. 547/2025 शस्त्र अधिनियम कायदा कलम 3, 25 सह महा.पो.का.कलम 37(1)135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 30 जून पर्यत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अटक आरेापीच्या विरूध्द यापुर्वी 1) खडकपाडा पोलीस स्टेषन गु.र.नं. 56/2023 भादवि कलम 326, 504, 34 2) खडकपाडा पोलीस स्टेषन गु.र.नं. 444/2025 एनडीपीएस कायदा कलम 8(क) 20(ब) प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई आषुतोश डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त, डाॅ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध 1, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -2, गुन्हे शाखा, ठाणे, यांचे मार्गदर्शना खाली सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि/कृश्णा गोरे, सपोपि/भुशण कापडणीस, पोउपनिरी/सुहास तावडे, सपोउपनिरी/संदीप भोसले, पोहवा/4044 ठाकुर, पोहवा/1015 पाटील, पोहवा/1510 गायकवाड, पोहवा/270 जाधव, पोहवा/1416 गडगे, पोहवा/4184 राठोड, पोहवा/18 कानडे, मपोहवा/4466 पावसकर, पोना/1925 हासे, पोना/7079 मधाळे, चापोना/7312 हिवरे, पोशी/3213 वायकर, पोशी/8246 ढाकणे, पोशी/2640 पाटील, पोशी/1984, मपोशी /8101 भोसले यानी केली आहे.