DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी -गेले एक दोन दिवस सकाळ पासून पावसाने दमदार हजेरी लावली होती मात्र बुधवारी दुपारच्या सुमारास अवघ्या अर्धा एक तास पडलेल्या धुंवाधार पावसामुळे कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्याच्या कडेला दुर्तफा पाणी साचले तर उंच सखल भागात पावसाचे पाणी गुडघाभर साचू लागल्याने नागरिकांची त्रेधापिट उडाली होती.
दुसरीकडे मुसळधार पावसाने पालिका मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या टेरेस पार पावसाचे पाणी साचून तलाव झाल्याने टेरेस वरील साचलेले पाणी पायऱ्यांवरून थेट खाली वाहून खालच्या मजल्यावरील आयुक्त कार्यालयाच्या दालन परिसरात पाणी साचले होते अखेरीस पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना कडून साचलेले पाणी बाहेर काढण्याची नामुष्की ओढवळी होती.तर टेरेस वरून येणारे पाणी खालच्या दुसऱ्या मजल्यावरील लिफ्ट च्या भागात पाणी शिरून तळ मजल्यावर उभी असलेल्या लिफ्ट मध्ये थिंबक सिंचन योजने नुसार पाणी गळती होऊ लागल्याने लिफ्ट बंद ठेवण्यात आली होती तर पालिका परिसर पावसाच्या पाण्याने जलमय झाला होता.पहिल्या पावसाने पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे पालिका आयुक्त अभिनव गोयल यांना अभिनव दर्शन झाल्याचे दिसले.
मुसळधार पावसाचे पालिका मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या टेरेसवर साचून पाण्याचे तलाव झाल्याने हे साचलेले पावसाचे पाणी टेरेस वरून खाल्ल्याच्या मजल्यावर पाऱ्यावरून खाली वाहून मध्ये पालिका आयुक्त दालन परिसरात पाणी शिरल्याने जलमय झाल्याने जमलेले पाणी काढण्यासाठी अखेर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून पाणी बाहेर काढत होते तर दुसरी कडे पालिका मुख्यालयातील लिफ्ट मध्ये ही पावसाच्या पाण्याची गळती होऊ लागल्याने लिफ्ट बंद करण्याची वेळ आल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये चांगलाच वायरल झाला आहे.त्यामुळे पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चवट्यावर आल्याचे चित्र नागरिकांना पाहायला मिळाले.