नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड/प्रतिनिधी – फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात मुस्लिम अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, दलित, भटके, आदिवासी, ओबीसी, यांच्यावरील पोलीस व धर्मांध जातीयवादी शक्तीकडून होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने एल्गार मार्चचे आयोजन करण्यात आले होते,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली व शेकडो मुस्लिम बांधव व वंचित चे कार्यकर्ते मोर्चा त सहभागी झाले, व घोषणानी परिसर दनानून सोडला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रमुख मान्यवरांनी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या कारभारावर तोफ डागली, या मोर्चा ला टायगर ऑटो युनियन, व तंजीमे इन्साफ या संघटनेने पाठींबा जाहीर केला कार्यक्रमाचे प्रस्तविक आयुब खान यांनी केले सुत्रसंचालन महंमद कासीम यांनी तर आभार प्रदर्शन ॲड शेख बिलाल यांनी केले.
या मोर्चा चे नेतृत्व प्रदेश प्रवक्ते फारुख अहेमद यांनी केले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, औरंगाबादहुन मुस्लिम इदेहात फ्रंटचे जावेद कुरेशी, मराठवाडा सचिव मोहम्मद तय्याब जाफर, भन्ते पंय्याबोधी, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, महानगर अध्यक्ष आयुब खान, विठ्ठल गायकवाड, श्याम कांबळे, निरंजना औटे, दैवशाला पांचाळ, सुरेश गजभारे, शेख कासीम, उबेद बाहुसेन, भीमराव बेंद्रीकर, तालुका अध्यक्ष विनायक गजभारे, उत्तरचे तालुका अध्यक्ष नरवाडे, डॉ वनजे सर, अमृत नरंगलकर, अशोक कापशीकर,धीरज हाके,दीपक कसबे, सम्यकचे कैलास वाघमारे, राहुल सोनसळे, जावेद अहेमद, रियाज शेख, शेख शाबीर, साहेबराव भंडारे, प्रा नंदकुमार गचे,नूर खान पठाण, जुबेर सय्यद, खान, रौफ लाला,उत्तम धर्मेकर,शेख वाजीद, शेख रहीम, अन्वर खान ,केशव सदावरते,यांच्या सह जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधीकारी महानगर पदाधिकारी, सर्व आघाडायचे पदाधिकारी सह शेकडो मुस्लिम पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



