महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

कल्याणात रेल्वे प्रवासासाठी बोगस ओळखपत्र बनवून देणारा पोलिसाच्या जाळ्यात

कल्याण /प्रतिनिधी– कल्याण मध्ये रेल्वे प्रवासासाठी बोगस ओळखपत्र देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कोरोना महामारी रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना लोकलप्रवास बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रेल्वेने प्रवास करू शकतात. असे असतांना मात्र रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी लागणारे अत्यावश्यक सेवेतील बोगस ओळखपत्र देण्याचा प्रताप करणाऱ्या २८ वर्षीय धनंजय बनसोडे याला कल्याण रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ बनावट ओळखपत्रासह ओळखपत्र तयार करण्याचे फॉर्म आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा स्ट्म्प आणि सही शिक्का पोलिसांनी जप्त केला आहे.

आरोपी हा बृहन्मुंबई महापालिकेच्या फ प्रभाग कार्यालयातील आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करत होता. तीन महिन्यापासून त्याला पगार मिळत नसल्याने पैशाची जमवाजमव कशी करायची या विवंचनेत असलेल्या धनंजय याला प्रवासा दरम्यान नागरिक ओळखपत्र कोठे मिळेल अशी विचारणा करताना आढळल्याने त्याने तीन दिवसापासून बनावट ओळखपत्र तयार करण्याचा निर्णय घेतला यासाठी त्याने काम करत असलेल्या कार्यालयातून रबर सही शिक्क्याचा स्ट्म्प आणि कोरे फॉर्म मिळवले.

यानंतर त्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून रेल्वे प्रवास सवलत मिळण्यासाठी कोणाला ओळखपत्र हवे असतील तर आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन फेसबुक मार्फत केले होते. हा मेसेज अज्ञात व्यक्तीने रेल्वे पोलीस आयुक्तांना पाठवल्या नंतर रेल्वे आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधत बनावट ग्राहक बनून त्याला कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर पकडले. मागील तीन दिवसात त्याने ६ ओळखपत्र तयार करून दिली असून यातील ४ कार्ड आणि कार्ड बनविण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केल्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »