महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
लोकल बातम्या

कल्याणात शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाने साकारली श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याणच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाने माघी गणेशोत्सवासाठी यंदा अतिभव्य अशी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून हा प्रभू श्रीराम मंदिराचा अप्रतिम असा देखावा सादर करण्यात आला आहे. आजच्या अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पांचा वाजत गाजत आगमन सोहळा संपन्न झाला.

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा या मंडळाच्या माघी गणेशोत्सवाचे 30 वे वर्ष असून अयोध्येत प्रभू श्रीरामलल्ला अतिसुंदर मंदिरामध्ये विराजमान झाले आहेत. अनेक भक्तांची इच्छा असूनही त्यांना अयोध्येला जाणे शक्य होत नसल्याने शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाने ही श्रीराम मंदिर प्रतिकृती साकारली आहे.

कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात गेल्या अनेक दिवसांपासून या भव्य मंदिर प्रतिकृतीचे काम सुरू होते. ही प्रतिकृती 40 फूट लांब, 90 फूट रुंद आणि 70 फूट उंच इतकी भव्य आहे. ज्याठिकाणी भक्तांना थेट आतमध्ये प्रवेश करून या मंदिराची रचनाही पाहता येत आहे. तसेच स्वर्गीय विशाल भोईर चौकापासून ते आत्माराम भोईर चौकापर्यंत अतिशय आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे.

गेल्या 30 वर्षांपासून अतिशय भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणारा हा बहुधा पहिलाच गणेशोस्तव असून धर्मवीर आनंद दिघे हे देखील दरवर्षी याठिकाणी दर्शनासाठी यायचे अशी आठवण आयोजक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी प्रभूनाथ भोईर यांनी यावेळी सांगितली. तसेच कल्याणसह आसपासच्या परिसरातील भाविकांनी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी तसेच ही अतिभव्य अशी मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी नक्की यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळाने येथील स्वर्गीय विशाल भोईर चौकापासून गणपती बाप्पांची वाजत गाजत मिरवणूक काढली होती.यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, स्थानिक लोकप्रतिनिधी जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, युवानेते वैभव विश्वनाथ भोईर यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »