महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image मुंबई लोकप्रिय बातम्या

महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कामगिरी,तस्करांकडून २१ कोटीचे ३६ किलो सोने केले जप्त

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – मुंबई विमानतळ आणि एअर कार्गो संकुलामधील सोन्याच्या तस्करीच्या विविध प्रकरणांशी संबंधित तपासादरम्यान, काही परदेशी नागरिकांचा गट तस्करी केलेल्या सोन्यावर प्रक्रिया आणि त्याचे वितरण करत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या तस्करी केलेल्या सोन्याची किंमत हवाला मार्गे केली जात असल्याची माहिती देखील प्राप्त झाली होती.  सिंडिकेटचा डाव उधळून लावण्यासाठी काही परदेशी नागरिक आणि संशयित भारतीय नागरिकांच्या प्रवासाच्या विशिष्ट पद्धतीवर डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने काळजीपूर्वक पाळत ठेवली होती. सोमवार, 23.01.2023 रोजी, डीआरआय मुंबईच्या अधिका-यांनी गुप्त माहितीच्या आधारावर, एक योग्य वेळ साधून आणि समन्वित कारवाईचे नियोजन केले आणि अंमलात आणली. सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत, डीआरआय अधिकार्‍यांच्या पथकाने ज्या संशयित जागेवर तस्करी केलेले सोने वितळणे आणि त्यावर प्रक्रिया केली जात होती, त्या जागेची झडती घेतली. या परिसराची कसून झडती घेतल्यावर, प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर असलेले 36 किलोपेक्षा जास्त वजनाचे  बेहिशेबी सोने जप्त करण्यात आले. या सोन्याचे एकूण मूल्य अंदाजे 21 कोटी रुपये इतके आहे. या परिसराच्या प्रभारी व्यक्तीने कबुली दिली की, आपल्याला हे सोने विदेशी नागरिकांसह विविध व्यक्तींकडून शरीरात लपवलेल्या कॅप्सूलच्या स्वरूपात, प्रवासी बॅग मधून, कपड्यांच्या थरात लपवून तसेच विविध प्रकारच्या मशीनच्या माध्यमातून मिळाले. या व्यक्तीकडे 20 लाख रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड देखील आढळून आली.   

चौकशी आणि तपासादरम्यान असे आढळून आले की, या सिंडिकेटद्वारे चालवल्या जाणार्‍या कोडच्या आधारे हे सोने दररोज देशातल्या वेगवेगळ्या व्यक्तींना (तस्करांना) वितरीत केले जात होते. या तपासात प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या पुराव्यांमधून, तस्करीसाठी सोने लपवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती उघडकीला आल्या.देशात वेगवेगळ्या स्वरूपात सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या संघटनांना  आळा घालण्यासाठी, योग्य पाळत ठेवून, डीआरआयचे अधिकारी सुसूत्रपणे राबवत असलेल्या कारवाईची ताकद या  कारवाईमधून दिसून येते.या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. देशात तस्करी केलेल्या सोन्याची बेकायदेशीर आवक उघडकीला आणण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी या  प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »