Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याणातील फरसाण कारखान्याला सिलेंडर गळतीमुळे लागली आग

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याणातील (Kalyan) प्रसिद्ध खंडेलवाल फरसाण कारखान्यात मोठी दुर्घटना घडली आहे. आज दुपारच्या सुमारास बेतूरकर पाडा विजय नगर येथील खंडेलवाल फरसाण कारखान्यात आग लागल्याची बातमी समोर आली आहे. आग (Fire) लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटना स्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे. यादरम्यान परिसरात धूर पसरल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला. सिलेंडर गळतीमुळे कारखान्यात आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु खंडेलवाल फरसाण कारखाण्याचे नुकसान झाले.

Translate »
X