नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – डोंबिवली पूर्वेतील आयरे – दत्तनगर परिसरातील आदिनारायन सोसायटीची इमारत कोसळली.या इमारतीमध्ये काही लोक अडकले आहेत. त्वरित अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. इमारत जुनी असून काही दिवसांपूर्वी रहिवाशांना इमारत खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
तरी देखील या इमारतीत काही रहिवासी राहत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्याचबरोबर सध्या या इमारतीच्या घटनेनंतर महानगरपालिका सज्ज होत आजूबाजूतील अनेक धोकादायक इमारतींना त्वरित खाली करण्याचे आदेश ही या वेळेला महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांडगे यांनी दिले आहेत.
Related Posts



