नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याणात विनापरवानगी घर तोडल्याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेतील मौजे गंधारे येथील श्री कृष्णा सोसायटी चिकणघर रस्ता याठिकाणी फिर्यादी अलका मनोहर वायले यांच्या मालकीचे चाळीतील घर त्यांच्या परवानगी शिवाय जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले.
घर तोडत असताना त्यांना विरोध केला असता विकासक व त्यांच्या सहकार्यांनी घरमालकांशी झटापटी केली व त्यांना धमकावले अशी माहिती घरमालक व फिर्यादी यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार खडकपाडा पोलिसांनी गुरुनाथ भोईर, विशाल गुरुनाथ भोईर, प्रफुल्ल सेनजालीया पटेल तसेच जेसीबी चालक यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.