महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केडीएमसीत साजरी

कल्याण /प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनानिमित्त शासनाच्या नियमांचे पालन करून, सोशल डिस्टसिंगचे पालन करून आज कल्याण पश्चिमेतील, डॉ. बाबासाहेब  आंबेडकर उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याच प्रमाणे महापालिका मुख्यालयातही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपायुक्त सुधाकर जगताप, महापालिका सचिव संजय जाधव तसेच सहाय्यक जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे उपस्थित होत्या.

 महापालिकेच्या डोंबिवली विभागातही विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत यांनी डोंबिवली कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि डोंबिवली कार्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, प्रभाग क्षेत्र अधिकारी, भरत पाटील, संदीप रोकडे आणि उद्यान अधीक्षक महेश देशपांडे उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »