महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजडेस्क शिक्षण

21 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी निवड, महाराष्ट्रातील 2 शिक्षकांचा समावेश

DESK MARATHI NEWS NETWORK

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी –  शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने उच्च शिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयातील 21 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी निवड केली आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या यादीत महाराष्ट्रातील मुंबई येथील शाह अँन्ड अँकर कच्छी  अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. नीलाक्षी जैन आणि बारामती येथील एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजीनियरिंग महाविद्यालयातील पुरुषोत्तम पवार यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये हे नमूद केले आहे की प्रेरित, उत्साही आणि सक्षम प्राध्यापक हे विद्यार्थी, संस्था आणि या पेशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. शिक्षण परिसंस्थेत उत्कृष्टतेची संस्कृती जोपासण्यासाठी पुरस्कार आणि सन्मान यासारख्या प्रोत्साहनांची तरतूद देखील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे. याच दृष्टीने, उच्च शिक्षण संस्था  आणि तंत्रनिकेतनसाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या छत्राखाली दोन श्रेणीतील पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय 2023 मध्ये घेण्यात आला. आजवर हा पुरस्कार केवळ शालेय शिक्षकांपूरता मर्यादित होता.

उच्च शिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतनमधील आदर्श शिक्षकांना खालील श्रेणींनुसार राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो:

श्रेणी 1: उच्च शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक:

उप-श्रेणी (i) : अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, वास्तुकला.

उप-श्रेणी (ii) : गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र यासह शुद्ध विज्ञान

उप-श्रेणी (iii) : कला आणि सामाजिक विज्ञान, मानव्य, भाषा, विधीशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन.

श्रेणी 2: तंत्रनिकेतन संस्थांमधील शिक्षक: एकूण 10 पुरस्कार

2025 वर्षासाठी निवड झालेले 21 शिक्षक तंत्रनिकेतन, राज्य विद्यापीठे आणि केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधील आहेत.

निवड प्रक्रियेत शिक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन अध्यापन शिक्षण परिणामकारकता, समाजाभिमुख उपक्रम, संशोधन आणि नवोन्मेष, प्रायोजित संशोधन आणि प्राध्यापक विकास कार्यक्रम तसेच सल्लागार अध्यापन यासारख्या निकषांनुसार करण्यात आले. यापैकी, शिक्षण परिणामकारकता आणि समाजाभिमुख उपक्रम या निकषांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठीच्या निवड प्रक्रियेत दोन टप्पे समाविष्ट आहेत; 

(i) नामांकित व्यक्तींची प्रारंभिक निवड करण्यासाठी प्राथमिक शोध आणि छाननी समितीद्वारे मूल्यांकन आणि 

(ii) राष्ट्रीय ज्युरीद्वारे निवडलेल्या नामांकित व्यक्तींमधून पुरस्कार विजेत्यांची निवड.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी नामांकने ऑनलाइन पद्धतीने @www.awards.gov.in वर मागवण्यात आली होती. यात स्व-नामनिर्देशन, संस्थात्मक नामनिर्देशन आणि सहकर्मी नामनिर्देशक या जनभागीदारीच्या तरतुदी समाविष्ट होत्या.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी – उच्च शिक्षण विभाग

Sr no. Name of the Institution State
Dr. Shreedevi

Faculty of Science and Technology, Sharnbasva University, Kalaburagi, Karnataka

Karnataka

 

Dr. Shobha M E

Manipal Institute of Technology, Udupi District, Karnataka

Karnataka
Dr. Anjana Bhatia

Hans Raj Mahila Maha Vidyalaya, Jalandhar, Punjab

Punjab
Dr. Debayan Sarkar

IIT Indore, Madhya Pradesh

Madhya Pradesh
Dr. Chandan Sahi

Indian Institute of Science Education & Research, Bhopal, Madhya Pradesh

Madhya Pradesh
Prof. Vijayalaxmi J

School of Planning and Architecture, Vijayawada, Andhra Pradesh

Andhra Pradesh
7.

 

Prof. Sanket Goel

Birla Institute of Technology & Sciences, Pilani, Hyderabad Campus

Telangana
8.

 

Prof. S Siva Sathya

Pondicherry University (A Central University), Puducherry

Puducherry
9.

 

Dr. Nilakshi Subhash Jain

Shah and Anchor Kutchhi Engineering College, Mumbai, Maharashtra

Maharashtra
10. Prof. Manoj B S

Indian Institute of Space science & Technology (IIST) Thiruvananthapuram, Kerala

Kerala
11. Prof. Shankar Sriram Sankaran

SASTRA Deemed University, Thanjavur, Tamil Nadu

Tamil Nadu
12. Prof. Vineeth N B

IIT Hyderabad, Telangana

Telangana
13. Prof. Vibha Sharma

Department of English, Faculty of Arts, Aligarh Muslim University, Uttar Pradesh

Uttar Pradesh
14. Prof. Srivardhini Keshavamurthy Jha

IIM Bangalore

Bangalore
15. Prof. Amit Kumar Dwivedi

Entrepreneurship Development Institute of India, Gandhinagar

Gujarat
16. Dr. Zoramdinthara

Mizoram University

Mizoram
17. Prof. Ganesh Timmanna Pandit

Central Sanskrit University, New Delhi

New Delhi
18. Dr. Proshanto Kumar Saha

Rajiv Gandhi University – A Central University, Papum Pare, Arunachal Pradesh

Arunachal Pradesh
19. Dr. Menda Devananda Kumar

Dr. Lakireddy Hanimireddy Government Degree College, Mylavaram, Andhra Pradesh

Andhra Pradesh
20. Prof. Purushottam Balasaheb Pawar

SVPM Institute of Technology and Engineering, Baramati, Pune, Maharashtra

Maharashtra
21. Shri Urvish Pravinkumar Soni

Government Polytechnic, Ahmedabad, Gujarat

Gujarat

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »