DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/ संघर्ष गांगुर्डे – महाराष्ट्र सर्कलमधील ठाणे – डाक विभागात आता कल्याण हेड पोस्ट ऑफिस व त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व उप डाक घरामंध्ये दिनांक ०४. ०८. २०२५ रोजी नवीन डिजिटल स्वरूपात स्थलांतर केले आहे. `द अडव्हान्स्ड पोस्टल टेक्नॉलॉजी – आयटी 2.0 अप्लिकेशन’ हा डाक विभागाचा डिजिटल रूपांतराचा उपक्रम आहे . हा मैसूरमधील सेंटर फॉर एक्सलन्स फॉर पोस्टल टेक्नॉलॉजी यांनी विकसित केला आहे. एपीटी-आयटी 2.0 प्लॅटफॉर्म प्रगत तंत्रज्ञान, सुधारित कार्यक्षमता डाक विभागाचे आधुनिकीकरण आणखी सक्षम करेल. हे अप्लिकेशन क्लाउड आधारित संगणन, मशीन लर्निंग, एआय-चालित अंतर्दृष्टी सक्षम करेल. ह्या बदला मुळे डाकघर वितरण सेवा आणि त्याच्या लेखा कामकाजाला गतिमान करेल.
या उपक्रमांतर्गत, डाक विभागाकडे युनिफाइड डेटा सेंटर (डीसी) आणि डिझास्टर रिकव्हरी (डीआर) ट्रांझिशन असेल जे आयटी 1.0 पासून आयटी 2.0 मध्ये स्थलांतरात मदत करेल. विभागाकडे आता एक व्यापक …दृष्टिकोन असेल – व्यवसाय विकास आणि ग्राहक-केंद्रित सेवांवर लक्ष केंद्रित करून मूल्य प्रदान करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल. एपीटी-आयटी 2.0 चे उद्दिष्ट वाढीव स्वयंचलन, स्केलेबिलिटी आणि सेवा विश्वसनीयतेसह संपूर्ण भारतात एकात्मिक, इंटेलिजन्ट डाक सेवाआहे. आयटी 2.0 हे इंडिया पोस्टला तंत्रज्ञान सक्षम, भविष्यासाठी तयार करण्याच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल आहे.
22 जुलै 2025 रोजी, ठाणे पोस्टल डिव्हिजन मधील ठाणे हेड पोस्ट ऑफिस व त्या अंतर्गत असणारी ठाण्यातील सर्व डाक घरांमध्ये स्थित असलेली सीएसआय प्रणाली मधुन एपीटी-आयटी 2.0 अप्लिकेशनमध्ये स्थलांतर झाले आहे. आणि आता कल्याण हेड पोस्ट ऑफिस व त्या अंतर्गत येणारी सर्व डाकघरात नवीन प्रणाली लागू करून आता १००% नवीन प्रणाली सर्व ठिकाणी कार्यरत झाली.
या प्रसंगी के. नरेंदर बाबू, एसएसपी, ठाणे विभाग यांनी संबोधित केले की, नवी मुंबई प्रदेशांतर्गत असलेल्या ठाणे विभागातील ठाणे हेड पोस्ट ऑफिस पायलट फेज रोल-आउटसाठी नामनिर्देशित करण्यात आले होते. ते यशस्वी झाल्यावर आता कल्याण हेड पोस्ट ऑफिससोबत अंबरनाथ उल्हासनगर , मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील सर्व पोस्ट ऑफिस चे रोल आऊट यशस्वी रित्या या पार पडले. ह्यासाठी सर्व प्री-रोल ऍक्टिव्हिटी वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यात आल्या. एसएसपीठाणे विभागयांनी असेही सांगितले की नवीन प्रगत पोस्टल टेक्नॉलॉजी अनोंदणीकृत टपालासाठी ट्रकिंग सुविधा, सीओडीसाठी डिजिटल क्यूआर पेमेंट, डिलिव्हरी रिमार्क्सचे रिअल-टाइम अपडेशन, डिजिटल स्वाक्षरी कॅप्चर करण्याचा पर्याय, स्थान आधारित वितरण, ओटीपी/आधार आधारित वितरण, तक्रार व्यवस्थापनासाठी सपोर्ट डेस्कसह घरापर्यंत पिकअप व्यवस्था इत्यादी साठी सक्षम करेल.
या उदघाटनाचे औचित्य साधून कल्याण येथील श्री गजाजन विद्यालयाच्या ५० विद्यार्थिनींची सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडण्यात आली. याप्रसंगी श्री गजाजन विद्यालयाच्या कल्पना पाटील मॅडम,मुख्याध्यापिका(प्राथमिक विभाग) कांचन भालेराव मॅडम मुख्याध्यापिका (माध्यमिक विभाग) व तसेच विद्यार्थिनीही उपस्थित होत्या. ह्या विद्यार्थिनींना माननीय के. नरेंदर बाबू, एसएसपी, ठाणे विभाग यांच्या हस्ते सुकन्या समृद्धी योजनेचे पास बुक वितरण करण्यात आले .
कल्याण हेड पोस्ट ऑफिस येथील उद्घाटन समारंभास डाक विभागातील अनेक मान्यवर, कल्याण हेड पोस्ट ऑफिस व कल्याण डिलिव्हरी सेन्टर येथील कर्मचारी आणि ग्राहकांची उपस्थिती लाभली. सर्व ग्राहकांना या नवीन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी विनंती केली
डाक विभागाच्या सुचिता जोशी, पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई रीजनल ऑफिस, आणि डॉ. अभिजित इचके, डायरेक्टर पोस्टल सर्व्हिस यांनी अमूल्य मार्गदर्शन केले व एपीटी-आयटी 2.0 च्या १००%यशस्वी रोल आउटबद्दल ठाणे विभागाचे अभिनंदन केले.