मुंबई/प्रतिनिधी – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) जून 2025 मध्ये मुंबई परवानाधारक सेवा क्षेत्रासाठी (एल एस ए) स्वतंत्र ड्राईव्ह चाचणीचे (आयडीटी) निष्कर्ष जारी केले आहेत, यामध्ये जून 2025 दरम्यान शहर आणि महामार्ग यांना व्यापणाऱ्या मार्गांचा समावेश आहे. बेंगळुरू येथील ट्रायच्या प्रादेशिक कार्यालयाच्या देखरेखीखाली घेण्यात आलेल्या ड्राईव्ह चाचण्या, विविध वापर वातावरणात – शहरी क्षेत्र, संस्थात्मक हॉटस्पॉट्स, सार्वजनिक वाहतूक केंद्रे आणि हाय-स्पीड कॉरिडॉरमध्ये वास्तविक-जगातील मोबाइल नेटवर्क कामगिरी पाहण्यासाठी डिझाइन केल्या होत्या.
17 ते 20 जून 2025 दरम्यान, ट्राय पथकाने मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात 243.1 किमी शहर चाचणी, 267 किमी महामार्ग चाचणी (मुंबई- चारोटी- कासटवाडी- विक्रमगड- कल्याण- ठाणे- मुंबई) आणि 09 हॉट स्पॉट्स विभागांमध्ये तपशीलवार चाचण्या घेतल्या. मूल्यमापन केलेल्या तंत्रज्ञानामध्ये 2G, 3G, 4G आणि 5G यांचा समावेश होता, जे अनेक हँडसेट क्षमतांमधील वापरकर्त्यांच्या सेवा अनुभवाचे प्रतिबिंबित करते. आयडीटीचे निष्कर्ष सर्व संबंधित दूरसंचार सेवा प्रदात्यांना (टीएसपी) कळविण्यात आले आहेत.
मूल्यमापन केलेले प्रमुख मापदंड:
अ. आवाज सेवा: कॉल सेटअप सफलता दर (सीएसएस आर ), ड्रॉप कॉल रेट (डीसीआर), कॉल सेटअप वेळ, कॉल सायलेन्स रेट, आवाज गुणवत्ता (एम ओ एस), व्याप्ती.
ब. आकडेवारी सेवा: डाउनलोड/अपलोड थ्रूपुट, लेटन्सी, जिटर, पॅकेट ड्रॉप रेट आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग विलंब.
मुंबई शहरातील एकूण मोबाइल नेटवर्क कामगिरीचा सारांश खालीलप्रमाणे आहे: –
कॉल सेटअप सफलता दर – ऑटो-सिलेक्शन मोडमध्ये (5जी/4जी/3जी/2जी) एअरटेल, एमटीएनएल, आरजेआयएल आणि व्हीआयएलचा हिस्सा अनुक्रमे 94.81%, 28.71%, 99.46% आणि 94.03% आहे.
ड्रॉप कॉल रेट – ऑटो-सिलेक्शन मोडमध्ये (5जी/4जी/३3जी/2जी) एअरटेल, एमटीएनएल, आरजेआयएल आणि व्हीआयएलची आकडेवारी अनुक्रमे 0.56%, 22.99%, 1.35% आणि 0.72% आहे.
5जी डेटा सेवा – शहरातील हॉटस्पॉट्समध्ये 879.66 एमबीपीएस पर्यंत पोहोचणारा पीक डाउनलोड स्पीड आणि 84.55 एमबीपीएस पर्यंत अपलोड स्पीड नोंदविण्यात आला
प्रमुख सेवा गुणवत्ता मापदंडांच्या तुलनेत कामगिरी
सीएसएसआर: कॉल सेटअप यश दर (% मध्ये), सीएसटी: कॉल सेटअप वेळ (सेकंदात), डीसीआर: ड्रॉप कॉल रेट (% मध्ये) आणि एमओएस: सरासरी मत स्कोअर.
मुंबईतील मूल्यमापनात कुलाबा, नेव्ही नगर, गेटवे ऑफ इंडिया , चर्नी रोड, मुंबई सेंट्रल, फोर्ट, सीएसएमटी, कोस्टल रोड, हाजी अली सी फेस, वरळी, वांद्रे वरळी सी-लिंक फ्लायओव्हर, मार्बल्स लाइन, प्रोफेसर एनएस फडके रोड, स्वामी विवेकानंद रोड, गोळीबार रोड, कळवा, पिंपळनेर, कल्याण , सोनारपाडा, कल्याण शिळफाटा रोड, मुंबई -आग्रा महामार्ग आणि सांताक्रूझ -चेंबूर लिंक रोड यासारख्या उच्च घनता असलेल्या परिसरांचा समावेश आहे.
ट्रायने 09 स्थिर हॉटस्पॉट्सवरील वास्तविक परिस्थितीचे मूल्यमापन देखील केले.
शहरांमधील प्रवासादरम्यान सेवेची गुणवत्ता समजून घेण्यासाठी हायवे मार्ग, मुंबईतील हाय-स्पीड मोबिलिटी स्ट्रेच आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे इत्यादींची देखील चाचणी घेण्यात आली.
या चाचण्या ट्राय कॅलिब्रेटेड उपकरणे आणि प्रमाणित प्रोटोकॉल वापरून रिअल-टाइम वातावरणात घेण्यात आल्या. सविस्तर अहवाल ट्राय संकेतस्थळ www.trai.gov.in वर उपलब्ध आहे. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी/माहितीसाठी, ब्रजेंद्र कुमार, सल्लागार (आरओ, बेंगळुरू) ट्राय यांच्याशी ईमेलवर संपर्क साधता येईल:adv.bengaluru@trai.gov.in or at Tel. No. +91-80-22865004.