नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय कृषी उत्पादनांची, विशेषतः आंब्याची जागतिक ओळख वाढवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) अबू धाबी येथे आंबा खरेदी प्रोत्साहन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात ‘इंडियन मॅंगो मॅनिया 2025’ याचेही उद्घाटन झाले – हा एक विविध जातींचा इन-स्टोअर आंबा महोत्सव आहे; जो युएईमधील भारतीय दूतावास आणि लुलू ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
आंब्याच्या चालू हंगामात आयोजित या महोत्सवाचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय ग्राहकांना, विशेषतः युएई आणि आखाती प्रदेशात मोठ्या संख्येने असलेल्या अनिवासी भारतीयांसमोर भारतातील सर्वोत्तम आंब्याच्या जातींचे प्रदर्शन करणे हे आहे.
प्रदर्शनात ठेवलेल्या उत्कृष्ट भारतीय आंब्याच्या जातींमध्ये बनारसी लंगडा, दशेरी, चौसा, सुंदरजा, आम्रपाली, मालदा, भारत भोग, प्रभा शंकर, लक्ष्मण भोग, महमूद बहार, वृंदावनी, फसली आणि मल्लिका यासारख्या जीआय-टॅग केलेल्या आणि प्रादेशिक वैशिष्ट्य दाखविणाऱ्या जातींचा समावेश होता.