DESK MARATHI NEWS ONLINE.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण मधील अ प्रभागातील सहा.आयुक्त प्रमोद पाटील यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे पथकप्रमुख राजेंद्र साळुंखे हे आपल्या पथकासह वडवळी येथील निर्मल लाईफ स्टाईल समोर सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेले असता, वैभव दुर्योधन पाटील आणि पंकज दुर्योधन पाटील यांनी त्यांस शिवीगाळ करुन धमकी दिली.
त्यानंतर दुर्योधन पाटील यांनी अ प्रभागाचे अधिक्षक शिरीष गर्गे व इतर कर्मचारी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी राजेंद्र साळुंखे यांनी वैभव दुर्योधन पाटील, पंकज दुर्योधन पाटील आणि दुर्योधन पाटील यांच्या विरुध्द खडकपाडा पोलीस स्टेशन, कल्याण (पश्चिम) येथे भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस), 2023 च्या कलम 132, 121(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.