महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

अग्रीम पिकविम्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे रास्ता रोको आंदोलन

नेशन न्यूज मराठी टीम.

बीड / प्रतिनिधी – जून महिना पूर्णतः कोरडा गेल्याने जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबट ओल्या ओलीवर शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने खरिपाची पेरणी केली होती. मात्र पेरणी झाल्यापासून दीड ते दोन महिने पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची पिके करपून गेली आहेत. परिणामी राज्यासह बीड जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या सरकारला शेतकऱ्यांविषयी कसलीच काळजी नसल्याचे दिसून येत आहे. खुद्द राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील असताना सुद्धा शेतकरी हे वाऱ्यावर सोडल्या सारखे झालं आहे.म्हणून या सरकारला जागे करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी चे बीड जिल्हा महासचिव अक्षय भुंबे यांच्या नेतृत्वाखाली डिघोळ अंबा या गावी राज्य रस्त्यावर गावकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधी घोषणा देत आपला आक्रोश व्यक्त केला.यावेळी अक्षय भुंबे यांनी बीड जिल्ह्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा लागू करावा,APL अंतर्गत शासनाने शेतकऱ्यांचे राशन बंद केले आहे ते परत सुरू करावे,डाटा एन्ट्री चालू करावी,प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात यावेत अशी मागणी केली. जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महासचिव अक्षय भुंबे यांनी दिला आहे.

यावेळी मंडळ अधिकारी श्रीमती देशमुख यांनी शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले व आंदोलन कर्त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडू असे आश्वासन दिले.यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी चे बीड जिल्हा अध्यक्ष बाबुरावजी मस्के, जिल्हा उपअध्यक्ष अस्लमभाई पठाण,अभिजित वाव्हळ अंबाजोगाई शहर अध्यक्ष अमोल हातागळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अजय वाघमारे तालुका अध्यक्ष अनिल कांबळे,परमेश्वर लांडगे, अविनाश घनघाव,योगेश घुंडरे, रामचंद्र घुंडरे,राहुल भूंबे,ऍड.विकास भुरे शेख रहिम शेख अफसर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »