नेशन न्यूज मराठी टीम.
जालना / प्रतिनिधी – देशभर अंमली पदार्थाची तस्करी होत असते, महाराष्ट्रात देखील ह्या गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता , विविध जिल्ह्यात अंमली पदार्थाचे छापे जप्त करून न्यायालयीन आदेशाने नष्ट केले जातात.अश्याच प्रकारची कार्यवाही जालना पोलिसांकडून सध्या केली गेली आहे,
गेल्या दीड वर्षात जालना पोलिसांनी गांजा जप्तीचे 14 गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व गुन्ह्यातून पोलिसांनी जिल्हाभरातून एकूण सात क्विंटल गांजा जप्त केला होता. हा सर्व गांजा आज विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाळून नष्ट करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या उपस्थितीत न्यायालयाच्या परवानगीने ही कारवाई करण्यात आली.



