महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image क्रिडा ताज्या घडामोडी

किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंचे यश

कल्याण/प्रतिनिधी – ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन आणि फ्रॅपर फोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंदिर हॉल, मुलुंड येथे शनिवारी प्रथमच अल्टिमेट मुंबई विभाग स्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत टिटवाळ्यातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करत यश मिळविले आहे.कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे गेल्या एक ते दीड वर्षापासून क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक खेळाडू खेळाच्या सरावापासून व स्पर्धे पासून वंचित होते. परंतु तब्बल १८ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यात शासनाने नेमून सर्व नियमांचे पालन करून विभाग स्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विभागातील सुमारे २०० पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेसाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

 टिटवाळा येथील विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन येथे मुख्य प्रशिक्षक विनायक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणारे गौरी तिटमे, मृण्मयी भोजणे, यश राठोड आणि भुषण जाधव हे ४ खेळाडू देखील या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. या स्पर्धेत अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत या खेळाडूंना अनुक्रमे गौरी तीटमे – सुवर्ण पदक, मृण्मयी भोजने – रौप्य पदक, भुषण जाधव – रौप्य पदक, यश राठोड – सहभाग असे १ सुवर्ण, २ रौप्य पदके प्राप्त झाले. या स्पर्धेत राष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक हरीष वायदंडे आणि गणेश गायकवाड यांनी पंच म्हणून कार्य केले.ऑलिंपिक खेळाच्या पार्श्व भूमीवर अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त युवक व युवतींनी सहभागी होऊन नक्कीच पुढील ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना सहभागी होण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक प्रयत्न करत आहेत. या स्पर्धेचे आयोजक व ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिशनचे अध्यक्ष मोहन सिंग आणि सचिव संजय कटोडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×