नेशन न्यूज मराठी टीम.
सांगली / प्रतिनिधी – सांगली जिल्ह्यातील कासेगाव पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर रक्तचंदनाची विक्री सुरु होती. ह्याची माहिती कासेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव व यांच्या टीमची मिळताच त्यांनी दमदार कामगिरी बजावली.
बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने रक्तचंदनाचे ओंडके आणलेल्या केदारवाडीच्या दोन आरोपींच्या कासेगाव (जि. सांगली) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रक्तचंदनाची एकुण ७५८.४०० किलोग्रॅम वजनाच्या ९१ लाख ८०० रुपये किंमतीची २० लाकडी ओंडके पोलिसांनी जप्त केली आहेत. आरोपी व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे.



