महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
यशोगाथा लोकप्रिय बातम्या

बार्टीच्या ९ विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत मारली बाजी

मुंबई/प्रतिनिधी – लॉकडाऊन मधला ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व राज्य सरकारच्या मदतीने प्रशिक्षण प्राप्त केलेल्या, अनुसूचित जातीतील 9 विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. सर्व यशस्वी भावी अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व करावे तेवढे कौतुक थोडेच आहे! तुम्हा सर्वांचा गर्व वाटतो, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बार्टीच्या यूपीएससीत यश मिळवलेल्या 9 विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.बार्टी व राज्य सरकारच्या मदतीने ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन जानेवारी 2021 मध्ये यूपीएससीच्या परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांपैकी लेखी परीक्षा व त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये यूपीएससी मार्फत झालेल्या मुलाखती व अन्य चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करून बार्टीच्या 9 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, हे 9 जण भारतीय सर्वोच्च नागरी सेवेत अधिकारी होणार आहेत.

यामध्ये सुहास गाडे (रँक-349), आदित्य जीवने (रँक-399), शरण कांबळे (रँक-542), अजिंक्य विद्यागर (रँक-617), हेतल पगारे (रँक-630), देवव्रत मेश्राम (रँक-713), स्वप्नील निसर्गन (रँक-714), शुभम भैसारे (रँक-727) आणि पियुष मडके (रँक-732) या भावी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.बार्टी मार्फत दरवर्षी राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे प्रायोजकत्व देण्यात येते. परंतु मागील काही महिन्यात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत प्रायोजकत्व देण्याऐवजी ऑनलाईन प्रशिक्षण व अन्य मदत केली जात होती. परीक्षेच्या पूर्वतयारी साठी सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश आमच्या प्रयत्नांना सार्थक करणारे आहे, या विद्यार्थ्यांनी भावी जीवनात मोठे अधिकारी म्हणून काम करताना देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे. सामान्य व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सतत आपल्या पदाचा सकारात्मक वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »