DESK MARATHI NEWS.
डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली महानगरपालिका सेवक वर्ग सहकारी पतपेढी मर्यादित संचालक मंडळ निवडणूक 2025-30 च्या निवडणुकीत दोन पॅनल व तीन अपक्ष निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. तब्बल 58 वर्षानी ही निवडणूक लागली असून याआधी बिनविरोध निवडणूक पार पडत होती. 27 तारखेला डोंबिवली पूर्वकडील क्रीडा संकुल मधील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त सभागृहात ही निवडणूक पार पडणार असून निवडणूक अधिकारी म्हणून श्रीकांत पाटील व शिवाजी राठोड काम पाहणार आहेत. सर्वसाधारण मतदार संघातून 6, महिला राखीव मतदार संघातून 2, अनुसूचित जमाती – जमाती मतदार संघातून 1, इतर मागासवर्ग मतदार संघातून 1 व भटक्या विमुक्त जाती- जमाती मतदार संघातून 1 असे एकूण 11 उमेदवारांना निवडून यायचे आहे. या निवडणुकीत 1929 सभासद मतदार करणार असून ही निवडणूक बॅलेट पेपरवर होणार आहे.
या निवडणूक उभे असलेले एकता पॅनलची निशाणी विमान, माऊली सहकारी परिवर्तन पॅनलची निशाणी पणती, अपक्ष उमेदवार सुनील सुर्वे यांची निशाणी हॉकी, अपक्ष उमेदवार केदार भोईर यांची निशाणी हिरा व नागेश उर्फ नागनाथ ठोळ यांची निशाणी कपबशी आहे. आतापर्यंत प्रत्येक पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होत होती.
एकता पॅनलचे उमेदवार विजय भोईर यांनी अनेक योजना असल्याचे सांगत संचालक मंडळाची संख्या वाढविणे, कल्याण विभागाकरता स्वतंत्र शाखा, संस्थेच्या कर्जावरील व्याजाचा दर कमी करण्याचा प्रयत्न या अशा अनेक योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. माऊली सहकार परिवर्तन पॅनलकडून घरातील सर्व सदस्यांचे ( आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी) रेशन कार्डवर नाव असलेल्या व्यक्ती जर कोणत्याही कारणामुळेमयत झाली तर त्यांना दोन तासाच्या आत अंत्यविधी साठी दहा हजार रुपये देण्यात येईल, सर्व कर्मचाऱ्यांना सर्व कर्जातून मुक्त करण्यासाठी दहा लाख कर्ज योजना व कमी व्याज दराने देण्याची व्यवस्था, कर्मचाऱ्यांना 15 लाख ते 20 लाख पर्यंत बँके मार्फत कमी दराने गृहकर्ज सोय, ग्रुप मेडिकल यासह अनेक योजना असल्याचे सांगितले. अपक्ष उमेदवार केदार भोईर यांनी पारदर्शक कारभार करण्यासाठी मतदान करण्याची विनंती केली आहे. अपक्ष उमेदवार नागेश उर्फ नागनाथ ठोळ यांनी माझा संस्थेसाठी असलेला प्रामाणिकपणा आणि आस्था आणि सभासदांची साथ याच्या जोरावर निवडणूक लढत असल्याचे सांगितले. अपक्ष उमेदवार सुनील सुर्वे यांनी सांगितल्यानुसार डोंबिवली महानगरपालिका सेवक वर्ग सहकारी पतपेढीची स्थापना ६ सप्टेंबर १९६६ रोजी झाली. आतापर्यत ही निवडणूक बिनविरोध होत होती. 58 वर्षीनी पहिल्यांदा डोंबिवली नगरपालिका सेवक वर्ग सहकारी पतपेढी संचालक पंचवार्षिक निवडणूक होत आहे. मी हाँकी या चिन्हांवर निवडणूक लढवत असून आपला विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.