DESK MARATHI NEWS.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या कल्याण परिमंडल कार्यालयात गुरुवारी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला. कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर जागतिक कामगार दिनानिमित्त वर्षभरात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या ५० उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.
सन २०२४-२५ या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी तांत्रिक कर्मचारी हे महावितरणच्या प्रगतीचे शिल्पकार असल्याचे नमूद करत स्वत:ला सिद्ध करण्याची क्षमता कायम जोपासण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले. अधिक जोमाने काम करून नवनवीन यशोशिखरे पादाक्रांत करण्याबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी अधीक्षक अभियंता दीपक पाटील, महेश अचिंनमाने, मोहन काळोगे, सहायक महाव्यवस्थापक सुशिल पावसकर, कार्यकारी अभियंता नितीन काळे, मिलींद चौधरी, सुनिल वनमोरे, पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता स्मीता काळे यांनी केले. तर वरिष्ठ व्यवसापक निलेश भवर यांनी आभार मानले.
पुरस्कार प्राप्त कर्मचारी
कल्याण मंडल एक – पूजा मोहरे, संतोष नवले, दत्तू भवारी, विठ्ठल भिवटे, सुनिल बोडके, मुकेश पाटील, तारासिंग पवार, बापु चौरे, सुधीर सोनावळे, जगदीश ढमके, विलास भोईर, शेषपाल चव्हाण, योगेश गायगोळे.
कल्याण मंडल दोन – प्रल्हाद म्हात्रे, अरुण इसामे, राजेंद्र पाटील, सुनिल खोजे, अमीत सोनकुसरे, ज्ञानेश्वर फोडसे, कृष्णा गाडे, सचिन घागस, दीनेश मोहपे, प्रितीलाल पांडव, विजय लोखंडे, योगेश चिमटे, तुलशीदास पाटील, दत्तू केंगळा, कान्या गावीत, शेखर दहातोंडे.
वसई मंडल – विवेक म्हात्रे, रविंद्र पारधी, विष्णू कळंगे, सुनिल गायकवाड, अशोक मराठे, सचिन चौगले, उमेश पाटील, राहुल घरत, कृष्णा साळी, मिलींद जाधव, मनोहर महाले, अनिल निकम.
पालघर मंडल – संदेश चुरी, सुभाष कुसमुडे, अनिल गिराणे, नयन संखे, संतोष शनवार, लडक्या बसवत, किशोर वढाणे, राजाराम गोडे, रमेश मुकणे.