Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

सलमान खान यांच्या घरावरील गोळीबार प्रकरणात आणखी ४ जणांना अटक

DESK MARATHI ONLINE.

नवी मुंबई/प्रतिनिधी – अभिनेता सलमान खान यांचे पनवेलमध्ये फार्महाऊस आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पाखे यांना माहिती मिळाली होती कि सलमान खान (Salman khan) यांच्या पनवेलमधील फार्महाऊसवर काही लोकं रेकी करुन आले आहेत. सलमान खान यांचा घातपात होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी सोशल मिडीया, व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून माहिती हस्तगत केली. त्या माहितीची खातरजमा झाल्यानंतर 24 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान चार जणांना अटक करण्यात आली.

आरोपींची चौकशी केली असता त्यांच्याकडे काही संशयस्पद वस्तू सापडल्या आहेत. त्याद्वारे ते अभिनेता सलमान खान यांचा घातपात करणार असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये सलमान खान यांच्या मुंबईतील घराची रेकी आणि फार्म हाऊसच्या घराची रेकी या चौघांनी केली असल्याचेही या प्रकरणांमध्ये आता उघडकीस आले आहे. यामध्ये पोलिस पुढील तपास करत असल्याची अशी माहिती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.

Translate »
X