महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे मुख्य बातम्या

लोकअदालतीतून वीज ग्राहकांची २९४ प्रकरणे निकाली,७३ लाख ९५ हजार रुपये वसूल

नेशन न्युज मराठी टीम

कल्याण/ तालुकास्तरावर आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीतून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी २९४ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी ७३ लाख ९५ हजार रुपयांच्या थकीत रकमेचा भरणा केला आहे.

कल्याण परिमंडलातील जवळपास ३८ हजार ग्राहकांना राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. यात कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलल्या ३७ हजार तर वीज चोरीची दाखलपूर्व व प्रलंबित एक हजार प्रकरणांचा समावेश होता. परंतू २९४ प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली व ७३ लाख ९५ हजार रुपयांची थकबाकी वसूल झाली. कल्याण मंडल एक अंतर्गत डोंबिवली, कल्याण पश्चिम व पूर्व विभागात ५९ ग्राहकांनी थकीत ३० लाख ७२ हजार रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला. तर कल्याण मंडल दोन अंतर्गत ३३ लाख ७८ हजार रुपयांची थकबाकी भरणाऱ्या ११८ ग्राहकांची प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. वसई मंडलांतर्गत वसई व विरारमधील ३० ग्राहकांनी लोक अदालतीत सहभागी होत ४ लाख २३ हजार रुपयांचा भरणा केला. तर पालघर मंडल कार्यालयांतर्गत ८७ ग्राहकांनी ५ लाख २१ हजार रुपयांची थकीत रक्कम भरून आपली प्रकरणे निकाली काढली.

लोक अदालत यशस्वी होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणासह मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधिक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर, सहायक विधी अधिकारी राजीव वामन, शिल्पा हन्नावार, उपविधी अधिकारी दीपक जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »