नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
बुलढाना/प्रतिनिधी – नांदुरा येथील मारवाडी गल्लीतील रहिवासी दामोदर आगरकर हे नांदुरा स्टेट बँक शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते. व कॅश काऊंटरवरुन ४० हजार रू. काढून कापडी थैलीत ठेवले होते. काही वेळाने त्यांच्या थैलीतील रक्कम लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी लगेच मुलगा श्रेयस दामोदर आगरकर याला माहिती दिली.
यानंतर बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता कॅश काऊंटरजवळ उभे असलेले आगरकर यांच्या हातातील थैलीतून दोन अनोळखी महिलांनी हाथचालाकी करून पैसे लंपास केले असल्याचे दिसून आले. याप्रकरणी श्रेयस आगरकर यांनी नांदुरा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली. फिर्यादीवरून दोन अनोळखी महिलांविरुद्ध भादंवि कलम ३७९,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.